जिल्ह्यात १४७ कंटेंटमेंट झोन ; रेड, नाॅन रेड झोन रद्द
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात १४७ कंटेंटमेंट झोन ; रेड, नाॅन रेड झोन रद्द

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : राज्य शासनाने लाॅकडाऊन ०.५ बाबत जारी केलेल्या गाईडलाईन्स जिल्ह्यात कोणतेही बदल न करता अंमलात आणल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील १४७ कंटेंटमेंट झोनमध्ये शंभर टक्के लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असून या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतिही शिथिलता देण्यात आलेली नाही.
‘मिशन बिगेन अगेन’ या मोहिमेअंतर्गत लाॅकडाऊन ३,५ व   ८जूनमध्ये टप्प्याटप्याने उठवला जाणार असून यापुर्वी दैंनदिन व्यवहारांवर असलेले निर्बंध हळूहळू उठवून जीवनमान पूर्वपदावर आणले जाणार आहे. त्यानूसार करोना रुग्णांची संख्या व तीव्रता दर्शविणारे रेड व नाॅनरेड झोन नव्या गाईडलाईन्समध्ये हद्दपार करण्यात आले आहे.
यापुढे फक्त कंटेंटमेंट झोन ठेवण्यात आले आहे. लाॅकडाऊन  ०.५ मध्ये देण्यात आलेली शिथिलता या ठिकाणी लागू नसेल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दैंनदिन व्यवहार व सेवांवर निर्बंध कायम राहिल. रेड व नाॅनरेड झोन रद्द केल्याने अर्थचक्र गतिमान होणार आहे.
जिल्ह्यातिल कंटेंटमेंट झोन
नाशिक शहर – २८, नाशिक तालुका – ७, मालेगाव – ४५, मालेगाव ग्रामीण – ६,  नांदगाव – ७, येवला – १४, चांदवड-४, निफाड- १४, सिन्नर – ११, दिंडोरी – ४, बागलाण – ४, कळवण -१, ईगतपुरी – १, देवळा-१
प्रतिक्रिया
राज्यशासनाने लाॅकडाऊन ०.५ बाबत जारी केलेल्या गाईडलाईन्स जिल्हयासाठी लागू राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंटेंटमेंट झोन क्षेत्रात अटिशर्ति लागू असून शंभर टक्के लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com