सकारात्मक विचार व योग्य काळजी घेत १४४ योद्ध्यांनी केली करोनावर मात
स्थानिक बातम्या

सकारात्मक विचार व योग्य काळजी घेत १४४ योद्ध्यांनी केली करोनावर मात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव येथे बंदोबस्तावर असतांना करोनाचा संसर्ग झालेल्या १४४ पोलीस कर्मचार्‍यानी या जीव घेणार्‍या आजारावर मात केली आहे.

सेवा बजावत असतांना कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने या योध्दांना बाधा झाली होती. मात्र सकारात्मक विचार व योग्य काळजी घेतल्याने वेळीच त्यांनी करोनाव मात केली असून त्यांची रग्णालयातून मुक्तता करण्यात आली आहे.

मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, या ठिकाणी जिल्ह्यातील निम्मी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. नागरीकांकडून सहकार्य मिळत नसल्याने ग्रामिण दलासह राज्यभरातील काही ठिकाणाहून जास्तीचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. ग्रामिण दलातील तीन पोलीस कर्मचार्‍यांचा या आजाराने बळी घेतला असून शेकडो कर्मचार्‍यानी या आजारावर मात केली आहे.

गेल्या पंधरवाड्यात मालेगाव येथे कर्तव्य बजावणार्‍या सुमारे दिडशे पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यात अधिकार्‍यांचाही समावेश होता. ही बाब उघडकीस येताच संबधीताना तात्काळ नाशिक शहरातील विविध रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यात ग्रामिणचे पोलीस दलचे ७७, जालना एसआरपीचे ३९, औरंगाबाद एसआरपीचे १० अमरावती एसआरपीचे १२ मरोळ आणि धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे २ व जळगाव पोलीस दलातील चार पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता.

उपचारादरम्यान संबधीत योध्दांनी करोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. यातील काही कर्मचारी या आजारातून बरे होवून पुन्हा कर्तव्यावर झाले आहेत. पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी कोरोना मुक्त अधिकारी कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे. तसेच इतरांना होऊनये यासाठी विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत. यामुळे घाबरून न आण्याचे आवाहन सिंह यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com