तीन दिवसात शहरात १३५ करोना संशयित दाखल; नाशिककरांची चिंता वाढली
स्थानिक बातम्या

तीन दिवसात शहरात १३५ करोना संशयित दाखल; नाशिककरांची चिंता वाढली

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शहरातील करोना बाधीतांच्या आकड्यात गेल्या तीन दिवसांपासुन सतत वाढत असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

शहरात शुक्रवारी ४६, शनिवारी (दि.१६) ५१ व रविवारी (दि.१७) ३८ अशाप्रकारे तीन दिवसात १३५ करोना संशयित रुग्णालयात उपचारार्थ शहरात दाखल झाले आहे. तसेच शहरात आज (दि.१८) एक रुग्ण वाढल्याने मनपा क्षेत्रातील ४७ व खाजगी रुग्णालयातील २ अशाप्रकारे एकुण बाधीतांचा ४९ झाला आहे. आजपर्यत संशयित म्हणुन दाखल झालेल्या १२९० पैकी १२२६ जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याने ही बाब नाशिककरांसाठी दिलासादायक आहे.

रविवारी (दि.१७) शहरातील विविध भागातून ३८ संशयित उपचारासाठी दाखल झाले असुन आता महापालिका क्षेत्रातील उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या १६० इतकी झाली आहे. रविवारी शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या ३३ वरुन २३ इतकी झाली होती.

आता यापैकी द्वारका भागातील जनरल वैद्यनगर या प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व निर्बंध आज हटविण्यात आल्याने आता प्रतिबंधीत क्षेत्राचा आकडा २२ झाला आहे. परिणामी वगळण्यात आलेल्या ११ प्रतिबंधीत क्षेत्रातील अति जोखमी व्यक्तींची व कमी जोखमीचा आकडा कमी झाला आहे.

आज नाशिकरोड विभागात आणखी एक बाधीत रुग्ण आढळल्याने आता रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर होण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या पुन्हा २३ होण्याची शक्यता आहे.

करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या १५१० झाली असुन यातील ८१६ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात १२९० संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर १२२६ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

आजपर्यत उपचार होऊन महापालिका क्षेत्रातील ४७ आणि खाजगी २ असे एकुण ४९ करोना बाधीत आढळले आहे.

नाशिक मनपा क्षेत्र करोना स्थिती
एकुण पॉझिटीव्ह – ४९
पुर्ण बरे झालेले – ३२
मृत्यु – ०२
उपचार घेत असलेले – १६०
प्रलंबीत अहवाल – १२३

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com