शहरात करोना बाधितांची संख्या १२९ वर; दोन दिवसात चार बाधीतांचा मृत्यु
स्थानिक बातम्या

शहरात करोना बाधितांची संख्या १२९ वर; दोन दिवसात चार बाधीतांचा मृत्यु

Gokul Pawar

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा आकडा वेगात वाढत असुन मंगळवारी(दि.२६) रोजी रात्री साडेअकरा पर्यत शहरातील रुग्णांचा आकडा १२९ इतका झाला आहे. गेल्या दोन दिवसात बाधीत असलेल्या २ पोलीस कर्मचार्‍यांसह ४ जणांचा मृत्यु झाल्याने आता मृतांची संख्या ८ झाली आहे.

केवळ मंगळवारी एका दिवसात १३ रुग्णांची भर पडली आहे. शहरातील बाधी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तीं या आता बाधीत होऊ लागल्या आहे. विशेषत: शहरातील संजीवनगर, वडाळागांव, रामनगर पेठरोड व दिंडोरीरोड हे हॉटस्पॉट बनले आहे.

सोमवारी(दि.२५) रोजी करोना बाधीत असलेल्या वागळे इस्टेट ठाणे येथील ५४ वर्षी चालकांचा शहरात मृत्यु झाला होता. यानंतर शहरात मंगळवारी (दि.२६) मालेगांव येथे करोना बंदोबस्त करुन परतलेले आणि करोना बाधीत झालेल्या दोन पोलीसांचा मृत्यु झाला. त्यांनंतर पखाल रोड भागातील एका ७३ वर्षीय व्यक्तींचा मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मृत्यु झाला.

अशाप्रकारे शहरात दोन दिवसात ४ जणांचा मृत्यु झाल्याने शहरातील मृत्युची संख्या ८ झाली आहे. मंगळवारी आठ वाजेपर्यत आलेल्या पॉझिटीव्ह अहवालात शहरात १२ संशयितांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. यात ८ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. वाढलेल्या रुग्णांत चंपानगरी नाशिकरोड येथील बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले ३८, २० व ४५ वर्षीय व्यक्ती बाधा झाली आहे.

नाशिक माकर्र्ट येथे काम करणार्‍या क्रांतीनगर पंचवटी येथील बाधीत रुग्णांच्या संंपर्कात आलेल्या २५ युवकाला करोना झाला असुन आगर टाकळी येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हनुमाननगर येथील २७ वर्षीय युवकाला बाधा झाली आहे.

तसेच दिंडोरी रोड भागातील लोकसहकारनगर येथील हॉटेल चालकांना करोना झाल्यानंतर त्यांच्या कुटुबांतील १३ वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पंडीतनगर येथील रुग्णांच्या संपर्कातील ६५ वर्षीय महिलेला करोना झाला आहे.

वडाळागांव रुग्णांच्या संंपर्कातील एका व्यक्ती बाधा झाली असुन जत्रा हॉटेल जवळील श्रीरामनगर भागातील रुग्णांच्या संपर्कातील ६४ वर्षीय व्ंयक्तीस करोना झाला आहे. तसेच पोलीस हेडक्वॉटर नाशिक येथील ग्रामीण पोलीस दलातील ३६ वर्षीय कर्मचार्‍यास बाधी झाली आहे.

अशाप्रकारे शहरातील एकुण रुग्णांचा आकडा १२८ झाला असला तरी यापैकी ४२ बाधीत बरे झाल्यानंतर घरी गेले आहे. यानंतर बुधवारी (दि.२७) सकाळी पंचवटीतील बाधीत हॉटेल चांलकांच्या संपर्कातील २५ वर्षीय युवक बाधीत झाल्याचा अहवाल आल्याने बाधीतांचा आकडा १२९ पर्यत गेला आहे.

दरम्यान शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या २१८८ झाली असुन यातील ९४५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात २३७१ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर २२३४ जणांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान ६ एप्रिल ते २६ मे २०२० या कालावधीत शहरात १२८ रुग्ण आढळून आले असुन ते राहत असलेल्या घराजवळील परिसर असे एकुण ५२ भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले होते. यातील २७ प्रतिबंधीत क्षेत्रात नव्याने करोना रुग्ण आढळून न आल्याने याठिकाणचे निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com