त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत १२२ जण क्वारंटाईन

त्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत १२२ जण क्वारंटाईन

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मध्ये आतापर्यंत १२२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून मागील आठवड्यात हि संख्या ९० वर होती.

दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरासह तालुका करोनामुक्त असल्याने येथील नागरिक भीती न बाळगता सर्रास शहरात गर्दी करीत आहेत. मागील आठवड्यात शहरातील क्वारंटाईन केलेंल्याची ९० होती आता या संख्येत भर पडली असून १२२ झाली आहे. यामध्ये घरात १०० तर बाहेर कक्षात २२ अशी विभागणी करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु शहरात स्थानिक नागरिकांसह ग्रेन भागातील नागरिक किराणा, बँकेचे कामकाज व इतर कामासाठी गर्दी करतांना दिसत आहेत.

तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसह सर्व नागरिकांना कळविण्यात येते की शहरात इतर राज्यातील लोक लाॅकडाऊन कालावधीत अडकले असतील तर त्या व्यक्तींची माहिती, मोबाईल नंबर, ज्या ठिकाणी जायचे आहे, तेथील पूर्ण पत्ता नगरपरिषद कार्यालयात तात्काळ देण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com