Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजीवाची पर्वा न करता १२ वर्षीय चिमुरडीने वाचविला महिलेचा जीव

जीवाची पर्वा न करता १२ वर्षीय चिमुरडीने वाचविला महिलेचा जीव

इगतपुरी । १२ वर्षीय चिमुरडीने प्रसंगावधान राखत एका महिलेचा जीव वाचविला आहे. सविता भाऊसाहेब बेंडकुळे असे त्या चिमुरडीचा नाव असून या धैर्यामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांनी या चिमुरडीस सन्मान देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान विहिरीवर पाणी भरतांना पाय घसरून विहिरीत पडलेल्या विवाहित महिलेचा आवाज ऐकून १२ वर्षीय सविताने तात्काळ बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचविला. या कर्तृत्वाची दखल वडीवऱ्हे पोलिसांनी घेत सविता हीची राज्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी कि, दि. २१ डिसेंबर रोजी गडगडसांगवी येथील शोभा मधुकर पाडेकर ही विवाहित महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली होती. पाणी शेंदतांना ओल्या जागेमुळे तिचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने तिने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. हे ऐकून सविताने कुठलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. अवघ्या काही मिनिटांत सविताने शोभा हिला वाचवले.

परिसरातील ग्रामस्थांनी सविता हिच्या शौर्याचे विशेष कौतुक केले. रेझिंग डेच्या निमित्ताने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांना तिला सन्मानित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या