नाशिक बाजार समितीतून बारा वाहनांमधून ४३६२ क्विंटल भाजीपाला रवाना
स्थानिक बातम्या

नाशिक बाजार समितीतून बारा वाहनांमधून ४३६२ क्विंटल भाजीपाला रवाना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असले तरी जीवनावश्यक वस्तूंचा आवक व लिलाव सुरू आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी(दि.२३) भाजीपाला,कांदा, बटाटा, फळे यांची ४३६२ क्विंटल इतकी आवक झाली. हा सर्व भाजीपाला व फळ भाज्यांची बारा वाहनांमधून ठाणे, कल्याण, भिवंडी, कांदिवली, बदलापूर, जव्हार या भागात हा पाठविण्यात आला, अशी माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, सचिव अरुण काळे यांनी दिली.

करोनामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरळीत असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्या या सुरू होत्या.त्यामुळे विविध शेती उत्पादनांचे लिलाव बाजार समित्यांमध्ये करण्यात आले.नाशिक जिल्ह्यातून मुंबईला भाजीपाला मोठ्या प्रमाणात जातो. तो आजही नियमित सुरू होता.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आवक भाजीपाला निहाय पुढील प्रमाणे क्विंटलमध्ये टोमॅटो- 310,वांगी 160,फ्लावर ५२,कोबी 43,ढोबळी मिरची 328, भोपळा 390, कारले 249, दोडका ७२, गिलके 66, भेंडी 24 ,गवार५, डांगर १९, लिंबू 10,काकडी 1230, पेरू १०, केळी 60 ,संत्रा 80, ओले नारळ 201, टरबूज 210 ,खरबूज 100, कांदा 150, बटाटा ५८५, लसूण 11 एकूण 4362 क्विंटल.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झालेला भाजीपाला मुंबईकडे पाठविण्यात आला असून तो ठाणे येथे सहा वाहनांमधून,कल्याण दोन, भिवंडी एक, कांदिवली एक,बदलापूर एक आणि जव्हार एक वाहनातून याप्रमाणे भाजीपाला पाठविण्यात आला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे,सचिव अरुण काळे यांनी दिली.

बुधवारी जनावरे खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांचीही मोठ्या प्रमाणात आवक होऊन खरेदी-विक्री दररोज होते.मात्र, करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी (दि.२५) जनावरे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतील,याची पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही सभापती संपतराव सकाळे, सचिव अरुण काळे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com