जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांची मदत

जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांची मदत

नाशिक : संकटात, सामाजिक बांधिलकी व कर्तव्य या भावनेतून खारीचा वाटा म्हणून नाशिक जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयाचा डिमांड ड्राफ्ट चेअरमन अद्वय हिरे व सर्व संचालकांच्यावतीने जिल्हा उपनिबंधक गैातम बलसाने यांच्याकडे देण्यात आला.

यावेळी शेतकरी नेते राजेंद्र डोखळे, संदीप गुळवे, भास्करराव बनकर, कोल्हे, मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी करोना आजाराबाबत मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिलजी देशमुख अन्न पुरवठा मंत्री छगन भूजबळ व आघाडी सरकार उत्कृष्ट काम करीत असल्याने या कामी त्यांना अधिक बळ मिळावे. यासाठी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र नाशिक येथे बलसाने यांचेकडे त्यांच्या कार्यालयात देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com