नाशिककरांची चिंता वाढली; एकाच दिवशी १०९ संशयित दाखल

नाशिककरांची चिंता वाढली; एकाच दिवशी १०९ संशयित दाखल

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी (दि.२१) रात्री पुन्हा ८ करोना रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असुन यातील ५ जण नाशिक शहरातील रहिवाशी आहे. उर्वरित ३ जण हे बाहेरील जिल्ह्यातील आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ५६ झाली असुन चेंबुर मुंबई येथून नाशिकला आलेल्या चार जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनाही शहरात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

यामुळेच शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्येत वाढ होणार आहे. दरम्यान बुधवार व गुरुवारी या दोन दिवसात शहराबाहेरील आठ रुग्ण शहरातील रुग्णालयात दाखल झाले आहे.

गुरुवारी (दि.२१) या एकाच दिवशी शहरात १०९ संशयित रुग्ण आढळून आले असुन आता उपचार घेत असलेल्या रुग्णांचा संख्या १९० इतकी झाली आहे.

गुरुवारी (दि.२१) शहरात सकाळी नवीन २ रुग्ण आढळून आले असुन यात दोन दिवसापुर्वी वडाळागांव येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ३० वर्षीय युवक व एक महिलेस बाधा झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. तसेच संजीवनगर शिवार (सातपूर अंबड लिंकरोड) या भागात रहिवाशी असलेली ७३ वर्षी व्यक्तीचा करोनामुळे मृत्यु झाल्याचे समोर आले होते.

ही व्यक्ती आपल्या मुलासमवेत मुंबईला २ मे रोजी अंत्य विधीसाठी गेले होते. त्यांचा १९ मे रोजी जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला होता. अशाप्रकारे शहरातील रुग्णांची संख्या ५१ इतकी झाली होती. यानंतर रात्री साडे अकरा वाजता शहरातील संशयित म्हणुन दाखल झालेल्या १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यातील ८ जण हे शहरातील आणि ४ जण हे मुबंईहून आल्याचे स्पष्ट झाले होते.

शहरातील आठ जणांत पंचवटीतील मालवीय चौक २, सातपूर अंबड लिंकरोड २, शिवाजीनगर वडाळा पाथर्डी लिंकरोड १, नाईकवाडीपुरा नाशिक १, पोलीस हेडक्वॉटर नाशिक १ व मोठा राजवाडा वडाळा नाशिक १ अशांचा समावेश आहे. यातील मोठा राजवाडा वडाळा नाशिक येथील बाधीत रुग्ण हा सफाई कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी (दि.२०) शहरातील विविध भागातून ६५ संशयित उपचारासाठी दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि.२१) रोजी शहरातील १०९ संशयित रुग्णालयात दाखल झाले असल्याने आता महापालिका क्षेत्रातील उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या १९० इतकी झाली आहे. शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या ३६ वरुन २३ इतकी झाली असुन यात वाढ होणार आहे.

करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या १७३३ झाली असुन यातील ८१५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात १५९४ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर १५६७ जणांना घरी सोडण्यात आले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com