Sunday, April 28, 2024
Homeनाशिकलॅंक्सेस इंडियाकडून करोना लढाईसाठी १ टन जंतूनाशकांची मदत

लॅंक्सेस इंडियाकडून करोना लढाईसाठी १ टन जंतूनाशकांची मदत

सातपूर : लॅंक्सेस इंडिया या केमिक्ल्स कंपनीतर्फे महाराष्ट्र सरकारला कोविड -१९ विरोधातील लढ्यात उपयुक्त ठरणारे “रिलॉय ऑन विरकॉन’ जंतूनाशक उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील हॉस्पीटल व इतर संस्थामध्ये कोविड -१९ चा प्रार्दुभाव कमी करण्यास मदत होईल.

मुंबईतील हाफ़कीन इन्स्टीट्यूट येथील महाराष्ट्र सरकारच्या रिलीफ़ को-ऑर्डिनेशन सेंटरला प्रत्येकी ५०० किलोग्रॅमच्या दोन भागांमध्ये हे उत्पादन पाठविण्यात येणार आहे.
“रिलॉय ऑन विरकॉन” त्वरीत कोरोनाला निष्क्रीय करते , ते वापण्यासाठी पातळ केले जाते सार्वजनिक वाहतुकीचे थांबे , विमानतळ, रूग्णालये, दवाखाने, शॉपिंग मॉल इ. ठिकाणी या जंतूनाशकाचा वापर उपयुक्त होऊ शकतो

- Advertisement -

लॅंक्सेस जागतिक स्तरावर जगभरातील १३ देशांमधील हॉस्पिटल्स , अधिकारी व सार्वजनिक संस्थांसाठी दहा मेट्रिक टन जंतुनाशक भेट दिली जाणार आहेत. रिलॉय ऑन विरकॉन च्या संपर्कात आल्यानंतर कोरोना विषाणू तातडीने निष्क्रीय होत असल्याचे चाचण्यांमध्ये हे सिध्द झाले आहे. सध्या होत असलेल्या कोविड -१९ च्या साथीला रोगाला कारणीभूत झालेल्या SARS-CoV-2 ला रोखण्यातही हे जंतूनाशक सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

सदर उत्पादनाचा वापर कोविड -१९ विरोधातील लढ्यामध्ये देण्यात आनंद होत आहे . या योगदानासाठीच आम्ही ‘रिलॉय ऑन विरकॉन’ चे उत्पादन व लॉजिस्टीक क्षमता त्वरीत नियोजित केली आहे. आम्ही या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी सरकारी अधिकारी व संस्थाबरोबर काम करण्यासाठी कटिबध्द आहोत.
– निलांजन बॅनर्जी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लॅंक्सेस इंडिया

- Advertisment -

ताज्या बातम्या