नागपूर : मायो हॉस्पिटलमधून कोरोना संशयित पाच रुग्ण बेपत्ता

नागपूर : मायो हॉस्पिटलमधून कोरोना संशयित पाच रुग्ण बेपत्ता

नागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता राज्यातही पाय पसरवायला सुरुवात केली आहे. राज्यातील पुणे, मुंबई नंतर नागपूरमध्येही बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत नागपूरातील मायो हॉस्पिटलमधून पाच कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या पाच रुग्णांपैकी एकाला कोरोनाची लागण न झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून चार जणांचे अहवाल अद्याप हाती आलेले नाहीत. परंतु रुग्ण बेपत्ता झाल्याने हॉस्पिटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. या संशयित रुग्णांना लवकरच शोधून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात येईल, अशी माहिती नागपूर पोलिस उप निरीक्षक एस. सुर्यवंशी यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असून आजपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सर्व जिम आणि स्विमिंग पूल्स ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच नागपूरातील सर्व सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल आणि पब्लिक गार्डन ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com