पत्रकार चौकात अपघात; तरुणाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

पत्रकार चौकात अपघात; तरुणाचा मृत्यू

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात झालेल्या भीषण अपघातात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. कमलेश अनिल पटवा (वय- 27 रा. भुतकरवाडी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दुधाने भरलेला टँकर नगर कडुन मनमाडच्या दिशेने चाललेला असताना यावेळी तारकपूरकडून सावेडीकडे दुचाकीवर चाललेला तरुण टँकरला जाऊन धडकला.

टँकर तरुणांच्या अंगावरून गेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार चौकातील वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना कैद झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. दरम्यान अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Deshdoot
www.deshdoot.com