नगरमध्ये 31 वर्षीय तरूणाला कोरोना; एकूण संख्या 21

नगरमध्ये 31 वर्षीय तरूणाला कोरोना; एकूण संख्या 21
आरोग्य यंत्रणा आणखी दक्ष रूग्णाच्या संपर्कात आल्याने बाधा
अहमदनगर ( प्रतिनिधी ) – नगरमध्ये रविवारी कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण आलमगीर (ता. नगर) या भागातील रहिवासी असून, तो 31 वर्षांचा आहे. मुकूंदनगरमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 21 करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी दोन रुग्णांचे चौदा दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा सरकारी रुग्णालयाने कोरोना संशयीत व्यक्तींचे 73 स्त्राव पुण्याच्या एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. या चाचणी नमुन्यापैकी 39 अहवाल रविवारी दुपारी चारच्या सुमारास प्राप्त झाले. त्यात एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित 38 अहवाल निगेटिव्ह आले होते. यातील बाधी व्यक्ती ही नगर तालुक्यातील आलमगीर येथील आहे. या व्यक्तीचा सोफा तयार करण्याचा व्यवसाय असून तो मुकूंदनगरच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तो पॉझिटिव्ह झाल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, नगर शहरातील मुकूंदनगर भागात आधीच दोन स्थानिक कोरोना बाधीत रुग्ण असून यामुळे हा परिसर पोलीसांनी सील केला आहे. त्यातच आता भिंगार भागाला खेटून असणार्‍या आलमगीर भागात कोरोना बाधीत असल्याने हा भाग देखील पोलिसांनी सील केला असून या भागातील अन्य नागरिक आणि कुटूंबांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

मुकूंदनगरचे संशयीत जुन्या दीपक हॉस्पिटलमध्ये
शनिवारी मुकूंदनगरच्या दोघ कोरोना बाधीत आढळ्यानंतर मनपा आरोग्य विभागाने या ठिकाणी बाधीतांच्या संपर्कात आलेल्या 100 हून संशयीतांना जुन्या दीपक हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करून ठेवले असून त्याचे स्त्राव नमुने घेण्यात आले आहेत.

लोणीच्या बाधीताच्या कुटूंबाचा अहवाल बाकी
लोणी परिसरात शनिवारी कोरोना बाधीत असणार्‍या रुग्णाच्या संपर्कात व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्याच्या कुटूंबातील काही व्यक्तींचे नमुना अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा रुग्णालयाने शनिवारी पाठविलेल्या 73 अहवालापैकी 39 चा अहवाल आला असून उर्वरित 34 व्यक्तींचे अहवाल शिल्लक आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com