याशिवाय मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधीत व्यक्तीचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. दरम्यान, 12 रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, मुकुंदनगर येथील 76 वर्षीय बाधीत रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून आणखी पाच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशा सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालय आणि बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन संस्थात्मक रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.