मुंबई पोलिस चारोळीतुन मांडताय वाहतुक नियमांचा जागर
स्थानिक बातम्या

मुंबई पोलिस चारोळीतुन मांडताय वाहतुक नियमांचा जागर

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : मुंबईसारख्या शहरात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत असताना अपघातांचेही प्रमाण वाढते आहे. यास कारणीभूत म्हणजे वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळण्यापेक्षा ते मोडण्यावरच अधिक भर देतात. यावर अनेक उपाय म्हणून मुंबई पोलीस आता चारोळीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे प्रबोधन करताना दिसत आहे.

शहरातील वाढती वाहने आणि अरूंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. यासाठी अनेक उपाय केले जातात. मुंबई पोलीस आता सोशल मीडियाच्या मध्यातून प्रबोधन करीत आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत चारोळ्या पोस्ट करतांना दिसत आहे.

वाहतुकीचे नियम हे प्रत्येक वाहनधारकास बंधनकारक असतात. तसेच यातून वाहतूक कोंडी, अपघात कमी करणे तसेच वाहनधारकांचे व नागरिकांचे प्रबोधन हा मुख्य उद्देश असून यामुळे वाहनधारकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन प्रबोधन करण्यासाठी आता चारोळ्यांचा आधार घेतला जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com