ठाकरे मंत्रिमंडळात ‘या’ तीन रणरागिणीं
स्थानिक बातम्या

ठाकरे मंत्रिमंडळात ‘या’ तीन रणरागिणीं

Gokul Pawar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल असून यामध्ये तीन महिवाल आमदारांनि मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्ष गायकवाडव यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे तर आदिती तटकरे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

दरम्यान ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार जवळपास ३४ दिवसांनी झाला असून यामध्ये ३६ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये तीन महिला आमदारांनाही स्थान देण्यात आले आहे. ठाकरे मंत्रिमंडळात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे.

तर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात पार पडला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज तसेच तरुण नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर आता कौत्साला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com