भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार
स्थानिक बातम्या

भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अॅन्ड हायर सेकेंडरी एज्युकेशन यांनी असा निर्णय घेतला आहे की, १० वी चा भुगोलाचा विषयाचा पेपर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे रद्द करण्यात आला होता.

त्यामुळे आता विद्यार्थ्यांना भुगोलाच्या पेपरसाठी सरासरी गुण दिले जाणार आहेत. परिक्षा २३ मार्चला पार पडणार होती. महाराष्ट्रातील जवळजवळ १.७ दशलक्ष विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परिक्षेसाठी बसले होते. ही परिक्षा मार्च ३ ते मार्च २३ पर्यंत पार पडणार होती.

भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आल्यानंतर बोर्डाने 10 वीच्या इतर विषयांच्या पेपरसाठी सुद्धा सरासरी मार्क दिले जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत एक परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले होते. त्याचसोबत विविध पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विषय परिक्षेच्या बाबत सुद्धा असाच नियम लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तोंडी, लेखी, प्रॅक्टिकल आणि इंनटरनल गुण सुद्धा सरासरी देण्यात येणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com