मनसे झेंड्याचा रंग बदलणार; २३ जानेवारीला अनावरण
स्थानिक बातम्या

मनसे झेंड्याचा रंग बदलणार; २३ जानेवारीला अनावरण

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती सावरत असतांना मनसे आपली राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा आहे. येत्या २३ जानेवारीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा बदलणार अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.

दरम्यान राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले असून आता मनसेही आपला ओसरता प्रभाव बदलण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे. यातील पहिले पाऊल म्हणजे मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार आहे. त्यामुळे नव्या झेंडाचा रंग कसा असेल अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

येत्या २३ जानेवारीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या नव्या झेंड्याचे अनावरण होणार आहे. मनसेच्या नवा झेंडा हा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवराजमुद्रा असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे २३ जानेवारीलाच याबाबत माहिती मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com