अखेर महाराष्ट्र बंद मागे; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
स्थानिक बातम्या

अखेर महाराष्ट्र बंद मागे; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Gokul Pawar

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. सायकलची चार वाजल्यापासून हा बंद मागे घे असल्याची घोषणा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान धारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज (दि.२४) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. यामध्ये राज्यातील अनेक शहरात बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान हा बंद राज्यभर पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. आज सकाळ पासून या बंदला सुरवात झाली होती.

मुंबई, नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये बंद पाळण्यात आला. सायंकाळी चार वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील जनतेचे आभार त्यांनी यावेळी मानले.

Deshdoot
www.deshdoot.com