Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशगृहिणींचे बजेट कोलमडणार; गॅसच्या दरात १९ रुपयांनी वाढ

गृहिणींचे बजेट कोलमडणार; गॅसच्या दरात १९ रुपयांनी वाढ

मुंबई : नवीन वर्षात गृहिणींचे बजेट कोलमडणार असून घरगुती गॅसच्या दरात १९ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामूळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे.

दरम्यान सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेने तिकीट दरात वाढ करीत सर्वांनाच धक्का दिला. आता २०२०च्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅसच्या किंमतीत १९ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

- Advertisement -

देशातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये हि वाढ करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता व चेन्नई यांचा समावेश आहे. यात १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीत ७१४ रुपये, कोलकाता ७४७ रुपये आणि मुंबईत६८४ रुपये आणि चैन्नई येथे ७३४ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या