देशातील २५ सक्षम महिलांची यादीत राज्यातून नवनीत राणा
स्थानिक बातम्या

देशातील २५ सक्षम महिलांची यादीत राज्यातून नवनीत राणा

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील २५ सक्षम महिलांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचाही या यादीत समावेश आहे.

नवनीत राणा बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावतीच्या खासदार आहेत. नवनीत राणा सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. तेथे त्यांनी आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवली. आता त्या राजकारणात सक्रिय असून संसदेत अमरावती लोकसभा मतदारसंघाते प्रतिनिधित्व करतात.

नवनीत राणा म्हणाल्या, आता जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे मी महिलांसाठी खूप काम करेन. गेल्या नऊ वर्षांपासून मी समाजसेवेत आहे. मला खासदार होऊन फक्त १० महिने झाले आहेत. त्याची दखल घेतली गेल्याने पुढील काळात मी निश्चितच संसदेत महिलांचे प्रश्न जोमाने उचलेन. त्यांना न्याय देईन.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com