आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ?
स्थानिक बातम्या

आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ?

Gokul Pawar

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारचा आज ३४ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तर होत असून यात नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज ३६ मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये एक नाव आदित्य ठाकरेंचे घेतले जात असून यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा सोहळा विधानभवन परिसरात असून कुणाला कोणते खाते मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

आज दुपारी १२ वाजता हा सोहळा रंगणार असून या सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com