मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात चालवला चरखा

मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात चालवला चरखा

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचे कुटुंबियांसह भारतात आगमन झाले असून मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात चरखा चालवला आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प सहपरिवार भारत दौऱ्यावर असून आज सकाळच्या सुमारास अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्र्म्प यांचे गळाभेट घेऊन स्वागत केले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात दाखल झाले. यावेळी साबरमती आश्रमात ट्रम्प यांनी पत्नीसह चरखा चालवला. ट्रम्प यांनी चरख्याचे कौतुक केले.

यांनतर डोनाल्ड ट्रम्प साबरमती येथून मोटेरा स्टेडिअमकडे रवाना झाले आहेत. तसेच २२ किमीचा रॉड शो होणार असून यामध्ये २८ राज्यांचे चित्ररथ दाखवले जाणार आहेत. अहमदाबाद ते मोटेरा स्टेडियम दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com