विदेशातून येणाऱ्या ‘त्या’ रुग्णांसाठी होम क्वॉरंटाइन; जाणून घ्या सविस्तर
स्थानिक बातम्या

विदेशातून येणाऱ्या ‘त्या’ रुग्णांसाठी होम क्वॉरंटाइन; जाणून घ्या सविस्तर

Gokul Pawar

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे भितीचे वातावरण पसरत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच आता घरी क्वॉरंटाइन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे.

दरम्यान मुंबई विमानतळावर निवडणुकीत वापरले जाणारे शाईने अशाप्रकारे स्टँम्पिंग केले जात आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना होम क्वॉरंटाइन करण्यात येणार असून त्यांना मतदानानंतर करतात त्याप्रमाणे शाई लावून मार्क येत आहे. घरी कोरन टाईम केलेल्या लोकांच्या हातावर एक विशिष्ट शिक्का मागण्यात येत आहे. शिक्का मारल्यानंतर हे लोक बाहेर दिसले तर ते घरी क्वॉरंटाइन आहेत हे लक्षात येईल

अशा व्यक्ती जर कुठेही रस्त्यावर फिरताना आढळल्या तर त्यांना आपले घरी जाणेस सांगणे. असे चिन्ह जे परदेशातून आलेले प्रवाशांसाठी असून त्यांनी १५ दिवस सर्वापासून अलिप्त रहाण्याची आवश्यकता आहे.

काय आहे होम क्वॉरंटाइन?

करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येत आहे. दहा करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जात आहे. ए मध्ये थेट लक्षणे दिसणारे लोक, बी मध्ये वयस्कर लोकं आणि कुठलीही लक्षणे न दिसणारी तरुण मुले सी कॅटेगरीमध्ये असतील. ए आणि बी मधील प्रवाशांची चाचणी करुन त्यांच्यावर उपचार केले जातील. तर लक्षणे न दिसणाऱ्या सी प्रकारातील प्रवाशांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना होम क्वॉरंटाइन केले जाईल. म्हणजे त्यांना पुढील १५ दिवसांसाठी बाहेर पडता येणार नाही.

Deshdoot
www.deshdoot.com