Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात १०८९ नवे रुग्ण; राज्यात एकूण बाधितांची संख्या १९०६३ वर

राज्यात १०८९ नवे रुग्ण; राज्यात एकूण बाधितांची संख्या १९०६३ वर

मुंबई : राज्यातील करोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. आज महाराष्ट्रामधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १०८९ इतकी झाली, यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९०६३ वर पोहचली आहे.

गेल्या २४ तासांत या आजारामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-१९ मुळे एकूण मृत्यूंची संख्या ७३१ झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण ३४७० लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुणे येथे सर्वाधिक कोरोणाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातल्या त्यात मुंबईच्या झोपडपट्टी परिसरातील परिस्थिती अजूनच गंभीर आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावी येथे आज कोरोनाचे २५ नवीन रुग्ण आढळले. धारावीमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या ८०८ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज ७४८ नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली व यासह एकूण रुग्णसंख्या ११६९७ वर पोहोचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या