राज्य मंत्रिमंडळविस्तारात ३६ मंत्री घेणार शपथ; ‘या’ तरुण आमदारांना संधी
स्थानिक बातम्या

राज्य मंत्रिमंडळविस्तारात ३६ मंत्री घेणार शपथ; ‘या’ तरुण आमदारांना संधी

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे समोर आली असून ८ कॅबिनेट व दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.

दरम्यान एकूण ३६ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असून यामध्ये काँग्रेसने आपली यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश आहे. त्याशिवाय के.सी. पाडवी, विजय वड्डेवटीवार, अमित देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर या मंत्रीमंडळात काँग्रेसने दोन महिलांना स्थान दिले असून यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

महत्वाची बाब अशी कि या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे हे देखील शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच आमदार अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com