श्रीनिवास गौडानंतर निशांत शेट्टी ठरला जगातला सर्वात वेगवान धावपटू

श्रीनिवास गौडानंतर निशांत शेट्टी ठरला जगातला सर्वात वेगवान धावपटू

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी श्रीनिवास गौडा या बांधकाम कामगाराने जमैकाचा धावपटू हुसेन बोल्टचा धावण्याचा विक्रम मोडीत काढला होता. परंतु आज याच शर्यतीत निशांत शेट्टी नामक व्यक्तीने १०० मीटर अंतर अवघ्या ९. ५१ सेकंदात पार केले आहे. त्यामुळे उसेन बोल्टला तर मागे टाकलेच परंतु काही दिवसापूर्वीचा विक्रमही निशांतने मोडीत काढला आहे.

दरम्यान निशांत शेट्टी याने ९.५१ सेकंदात १०० मीटर पूर्ण केले आहे. बाजागोली जोगीबेट्टू येथील निशांतने वेन्नूर येथे रविवारी झालेल्या स्पर्धेत हा विक्रम रचला आहे. यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या श्रीनिवास यास क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी थेट ऑलिम्पिकला पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. परंतु आता निशांतने नाव विक्रम रचल्यानंतर आता पुढे काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कम्बाला खेळ काय आहे?
महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धेप्रमाणेच कर्नाटकातील उडपी आणि मेंगलोर परिसरात हि कंबाला स्पर्धा फारच गाजलेली स्पर्धा असून या खेळात दोन म्हैशीला एका लाकडाला ( शिवळाला ) जुंपून अतिशय पातळ चिखलाच्या पाण्यातून पळविले जाते. बैलगाडीप्रमाणे पाठीमागे गाडीवगैरे काही नसते. तर त्याऐवजी दोन म्हैशी पळवत न्यायच्या असतात. यावेळी १४३ मीटरचे अंतर कापण्यासाठी निशांतने १३. ६८ सेंकंदाचा वेळ घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com