राज्यातील १३८८ पोलीस करोनाच्या विळख्यात तर १२ जणांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

राज्यातील १३८८ पोलीस करोनाच्या विळख्यात तर १२ जणांचा मृत्यू

Gokul Pawar

मुंबई : राज्यातील १३८८ महाराष्ट्र पोलिसांना करोनाची लागण झाली असून १२जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात ९४८ जणांवर उपचार सुरू असून ४२८ पोलिसांनी या आजारावर मात देखील केली आहे.

दरम्यान आज (दि.२०) दुपारी १२ वाजेपर्यंत ची ही आकडेवारी आहे. मागील दोन महिन्यांपासून भारतामध्ये करोना व्हायरस लॉकडाऊन आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशामध्ये बंदोबस्ताच्या ड्युटीपासून क्वारंटीन सेंटर ते नाक्यानाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे करोनाच्या विळख्यात आता पोलिस कर्मचारी देखील आले आहे.

गेल्या दीड ते २ महिन्यांचा पोलिसांवरील ताण लक्षात घेता आता केंद्राचे सुरक्षा दलाचे जवान महाराष्ट्रात काम करण्यास सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद अशा करोना हॉटस्पॉट अधिक असलेल्या ठिकाणी केंद्राच्या जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

भारतासह महाराष्ट्रात दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ बघायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा ३७ हजाराच्या पार गेला आहे. त्यामुळे आता प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यांच्यावरील ताणदेखील वाढला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com