Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रदेशातील पहिल्या रेल्वेला १६७ वर्षं पूर्ण; पहिल्यांदा दीर्घ कालावधीसाठी रेल्वे बंद

देशातील पहिल्या रेल्वेला १६७ वर्षं पूर्ण; पहिल्यांदा दीर्घ कालावधीसाठी रेल्वे बंद

नाशिक : आजचा दिवस भारतासाठी विशेष असून याच दिवशी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे सेवा सुरू झाली होती. ब्रिटिश काळात १६ एप्रिल १८५३ या दिवशी भारतातील पहिली रेल्वे सुरु झाली.

दरम्यान सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या १६७ वर्षांत पहिल्यांदा रेल्वे थांबली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिशांनी मुंबई सीएसटी ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू केली होती. भारतातील या पहिल्या ट्रेनमधून तेव्हा सुमारे ४०० नागरिकांनी प्रवास केला. हा प्रवास सुमारे ३४ किलोमीटर दूर अंतरावर पसरलेल्या रेल्वे रुळावरुन झाला.

- Advertisement -

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वे वाहतूक आज ठप्प आहे. परिणामी देशभरातील नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहे. जवळपास संपूर्ण देशच ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावरुन भारतीय दळणवळण ट्रेन किती महत्त्वाची याची प्रचिती येते.

दरम्यान, एकेकाळी सीएसएमटी ते ठाणे अशी असलेली रेल्वे आज प्रचंड विस्तारली आहे. तिचा भारतभर विस्तार तर झाला आहेच. परंतू, मुंबईतही मोठा विस्तार झाला आहे. सीएसएमटी ते ठाणे अशी मुख्य रेल्वे असलेला हा मार्ग आता मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रल्वे म्हणून ओळखला जातो. हा मार्ग आता सीएसएमटी ते कल्याण आणी पुढे कर्जत, खोपोली आणि कसारा तर सीएसएमटीवरुन हार्बर मार्गे पनवेल.

तसेच चर्चगेट ते डहाणू असा विस्तार करण्यात आला आहे. मध्येच ठाणे ते पनवेल, वाशी अशी ट्रान्स हार्बर लाईनही आहे. शिवाय मेट्रो आणि मोनो ट्रेनही आहेत. असा हा मुंबई रेल्वेचा विस्तार झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या