अभिनेता शाहरुख खानकडून महाराष्ट्राला २५ हजार पीपीई किट
स्थानिक बातम्या

अभिनेता शाहरुख खानकडून महाराष्ट्राला २५ हजार पीपीई किट

Gokul Pawar

मुंबई : शाहरुख खान याने दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने त्याचे आभार मानले आहेत. अभिनेता शाहरुख याने महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार पीपीई किट दिले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या योगदानाबद्दल शाहरुख यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

सध्या राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असून तपासणी साठी लागणाऱ्या पीपीई किट्सचा तुटवडा भासत आहे. अशा पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खान याने राज्यासाठी २५हजार किट्सची मदत केली आहे.

यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटमधून शाहरुख चे आभार मानले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘शाहरुख खान खूप खूप आभार, आपण २५ हजार पीपीई किटचे योगदान दिले आहे. कोरोना व्हायरस संकटाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला हे प्रदीर्घ काळासाठी तसेच कोरोनाविरुद्धच्या पहिल्या फळीत काम करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.’

Deshdoot
www.deshdoot.com