राज्यातील २२११ पोलिसांना करोनाची लागण; २४ तासांत ११६ जणांना करोनाची बाधा
स्थानिक बातम्या

राज्यातील २२११ पोलिसांना करोनाची लागण; २४ तासांत ११६ जणांना करोनाची बाधा

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांभोवतीचा विळखा देखील जनसामान्यांप्रमाणेच आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये १०० पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान मागील २४ तासामध्ये ११६ पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तर कोरोना व्हायरसने मागील २४ तासांत ३ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात आता एकूण २२११ पोलिस कर्मचारी कोरोना व्हायरसच्या विळख्यामध्ये अडकले आहेत. तर एकूण २५ जणांची कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई अयशस्वी ठरल्याने त्यांचं निधन झालं आहे.

देशामध्ये दीड लाखाच्या पार गेलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक करोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, अकोला मध्ये संचारबंदी कडक ठेवण्याचं आव्हान सध्या महाराष्ट्र पोलिसांसमोर आहे. मात्र मागील २ महिन्यांपासून दिवस रात्र काम करणार्‍या पोलिसांवर आता कामाचा ताण आला आहे.

दरम्यान पोलिसांना काही काळ आराम देऊन त्याजागी निमलष्करी दलाचे जवान तैनात करून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचं काम केले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com