१५ मेपासून आतापर्यंत ९ लाख ४७ हजार ग्राहकांना घरपोच मद्य विक्री
स्थानिक बातम्या

१५ मेपासून आतापर्यंत ९ लाख ४७ हजार ग्राहकांना घरपोच मद्य विक्री

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : १५ मे पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. १५ मे २०२० ते ५ जून २०२० या काळात ९ लाख ४७ हजार ८५९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात ५९ हजार ४९८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.

यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३४ हजार ००४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७ हजार २६१अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे.

राज्यात दि. १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याचीसुविधा उपलब्ध आहे.

२ मे २०२० ते ३१ मे २०२० या काळात १ लाख २० हजार ५४७ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख १० हजार ७६३ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com