भारीच! प्लॅस्टिक कचर्‍यातून बनवला चाळीस किलोमीटर रस्ता

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पात टाकाऊ प्लॅस्टिक कचर्‍यापासून 40 किलोमीटरचा रस्ता अंतर्गत वाहतुकीसाठी तयार करण्यात आला आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने तयार केलेल्या या रस्त्यासाठी 50 टन टाकाऊ प्लॅॅस्टिक कचरा वापरला गेला.

प्लॅस्टिक कचर्‍याचे व्यवस्थापन ही एक वैश्विक समस्या बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन रिलायन्स इंडस्ट्रीजने नागोठण्यातील प्रकल्पात टाकाऊ प्लॅस्टिक कचर्‍यापासून ४० किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला आहे. ५० टन प्लॅस्टिक कचरा वापरून हा रस्ता तयार केला आहे.

‘रिलायन्स’च्या नागोठणे प्रकल्पासाठी तयार केल्या जाणार्‍या रस्त्यासाठी पेण शहरातील टाकाऊ प्लॅस्टिक संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यातून तयार झालेले ‘शेडेड प्लॅस्टिक’ रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आले. त्यापासून मजबूत रस्ता तयार करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसानंतरही हे रस्ते खराब न होणारे आहेत.

हा रस्ता बनवण्यासाठी दुधाच्या पिशव्या, चॉकलेट, वेफर्सचे रॅपर आणि इतर खराब प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे हा रस्ता तयार होताना प्रत्येक किमी मागे एक लाख रुपयांची बचत झाली आहे.दर पावसाळ्यात राज्यात रस्त्यांची दुर्दशा होते. मात्र पावसातही या रस्त्याचं नुकसान होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *