२९ फेब्रुवारीपासून राज्यात पाच दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

२९ फेब्रुवारीपासून राज्यात पाच दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाविकासाआघाडीच्या सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा असणार आहे.

दरम्यान राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी ५ दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी ठाकरे सरकारने मान्य केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली असून येत्या २९ फेब्रुवारीपासून याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा अशा बाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मात्र अत्यावश्यक सेवांसाठी पाच दिवसांचा आठवडा नसेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com