राज्यात कोरोनाचा पहिला बळी; ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

राज्यात कोरोनाचा पहिला बळी; ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात राज्यातील पहिल्या कोरोना ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान ६४ वर्षीय एका जेष्ठ नागरिकाचा बळी गेला आहे. हिंदुजा रुग्णालयातून या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.

राज्यातील नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाने दिलेली सूचनांचे पालन नागरिकांनी करावयाचेआहे.

Deshdoot
www.deshdoot.com