Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रकौतुकास्पद! मुंबई येथील महिला पोलीसाने दत्तक घेतले पन्नास विद्यार्थी!

कौतुकास्पद! मुंबई येथील महिला पोलीसाने दत्तक घेतले पन्नास विद्यार्थी!

मुंबई : करोना संकटात पोलीस दलातील प्रत्येक जण परिस्थितीवर मात करत कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावताना आतापर्यंत अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान मुंबई येथील एका महिला पोलिसाने चक्क पन्नास विदयार्थ्यांना दत्तक घेतले आहे. रेहाना नासिर शेख (बागवान) असे या महिला पोलिसाचे आहे.

- Advertisement -

करोना संकटात मुंबईतील नायगव येथे डब्ल्यू २ कंपनीच्या महिला कारकूनपदी कर्तव्य बजावणाऱ्या पोना रेहाना शेख यांनी मुलीच्या वाढदिवसा दिवशी रायगड जिल्ह्यातील (धामणी, पो. वाजे, ता. पनवेल) ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाद्यपदार्थ पाठवले. तसेच करोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी हॅण्ड ग्लोज, सॅनिटायझर, मास्कदेखील पाठवले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी व शालेय प्रशासनाने पोना रेहाना शेख यांच्या मुलीला (व्हिडीओद्वारे) शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या विद्यार्थ्यांचा गरजा, अडचणी व शिक्षणाची जीद्द लक्षात घेऊन रेहाना शेख यांनी ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. उज्ज्वल भारताचे नागरिक घडवण्याचा दृष्टीने पोना रेहाना शेख यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंदी दिवकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महादेवबुवा शहाबाजकर यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या