Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रखासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध; संबंधितावर गुन्हा दाखल होणार

खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध; संबंधितावर गुन्हा दाखल होणार

मुंबई : ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात एका खाजगी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधितावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान ग्रामविकास विभागाच्या विविध पदांच्या पदभरतीसाठी जाहिरात https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

सदर जाहिरात ही खोटी असून या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे.

या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे खोटी जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या खोट्या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये असे आवाहन ग्रामविकास विभागाचे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या