राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२४ वर; मुंबई, ठाण्यात दोन नवे रुग्ण
स्थानिक बातम्या

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२४ वर; मुंबई, ठाण्यात दोन नवे रुग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२४ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान राज्यातील कोरोना ग्रस्तांचा हा आकडा काळजी वाढविणारा आहे. कारण देशातील कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे.

आजची आकडेवारी

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लॉक डाऊन आहे, कोरोना व्हायरसच्या संसर्ग रोखण्यासाठी गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com