मध्य रेल्वेच्या ‘या’ गाड्या दहा दिवस रद्द; असे आहे वेळापत्रक
स्थानिक बातम्या

मध्य रेल्वेच्या ‘या’ गाड्या दहा दिवस रद्द; असे आहे वेळापत्रक

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वाहीनी अशी ओळख असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आजपासून बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान मुंबईत आज महाराष्ट्रातला कोरोनाचा पहिला बळी गेला आणि त्यानंतर खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्याशिवाय या आजारावर मात करण कठीण असल्यामुळे रेल्वे सेवा कदाचित स्लो डाऊन केली जाणार आहे. सध्या मुंबईतील रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा गर्दी कमी असली तरी लोकलमध्ये गर्दी दुरून आहे. यासाठी २२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे-मुंबई निझामाबाद, नागपुर-मुंबई, पुणे-नागपुर, भुसावळ-नागपुर यासारख्या लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या १७ ते २९ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुढील गद्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.

Deshdoot
www.deshdoot.com