पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय
स्थानिक बातम्या

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत वर्षभरातील गुणवत्ता मूल्यांकन करून त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी निर्णय घेण्यात असून त्यातलाच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले आहेत, या पार्श्वभूमीवर अगोदरच राज्यातील सर्व शाळा- कॉलेजेस ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, यासोबतच आता परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यापूर्वीच दहावी आणि बारावी सोडून सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच ९ वी आणि ११ वी च्या परीक्षा या १५ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर १५ एप्रिल नंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com