Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील पोलीस दलातील १००१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण तर ८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

राज्यातील पोलीस दलातील १००१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण तर ८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. करोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तसेच रस्त्यावर पोलीस दलातील कर्मचारी अहोरात्र गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.

याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण १००१ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे ८ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस दलातील १ हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी ८५१ अॅक्टिव्ह रुग्ण, १४२जणांची प्रकृती सुधारली आणि ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांवर हल्ले केल्याची २१८ प्रकरणे लॉकडाउनच्या काळात समोर आली आहेत. आतापर्यंत ७७० आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी सु्द्धा महाराष्ट्र सरकारने पोलीस, डॉक्टरांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सुचना दिल्या होत्या. तरीही पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या