Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्रात पोलीस दलातील ४८७ कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात पोलीस दलातील ४८७ कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

सरकारकडून करोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सरकारने लॉकडाउनचे नियम काही ठिकाणी शिथिल केल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवल्याचे दिसून आले.

- Advertisement -

त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत. परिणामी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पोलीस कर्मचारी ही वैद्यकिय कर्मचाऱ्यांसारखेच अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता पोलीस दलातील ४८७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात विविध ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यानुसार कलम १८८ अंतर्गत ९६२३१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ५३३३० वाहने जप्त आणि १८८५८ जणांना अटक केली आहे.

तर १८९ जणांना पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ऐवढेच नाही तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ कोटी ५६ लाख ८१ हजार ९९४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या