राज्याचा आकडा पोहचला ३२०२ वर तर मृतांची संख्या १९४ वर

राज्याचा आकडा पोहचला ३२०२ वर तर मृतांची संख्या १९४ वर

मुंबई : राज्यासह देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबधितांचा आकडा ३२०२ वर पोहचला असून मृतांचा आकडा १९४ वर पोहचला आहे.

दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्याासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारने लॉकडाउनचे आदेश सुद्धा पुढील काही दिवस लागू राहणार असल्याचा निर्णय जाहिर केला आहे. तरीही नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहेत. तर काहीजण कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर सुद्धा घाबरत असून लपून बसत आहेत. मात्र सराकरने कोरोनाची चाचणी करुन त्यासंबंधित वैद्यकिय उपचार घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज सकाळपर्यंत नवे २८६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com