नगर : मुकूंदनगरच्या अहवालाकडे नजरा
स्थानिक बातम्या

नगर : मुकूंदनगरच्या अहवालाकडे नजरा

Sarvmat Digital

मंगळवारी आलेले सर्व अहवाल जामखेडचे

अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक कारणासाठी परदेशातून आलेल्या तसेच नगर शहरातील मुकूंदनगर आणि जामखेड शहरातील धार्मिक स्थळात वास्तव्यास असलेल्या 12 आणि देशातील दोघा अशा 14 व्यक्तींपैकी दोघांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेडमधील तिघांचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आली आहे.

यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्या पॉझिटीव्हीच्या संपर्कात जामखेडचे अहवाल आले असले अद्याप नगर शहरातील जामखेडच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालाकडे जिल्ह्याच्या नजरा आहेत.

दरम्यान, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने नगर शहरातील मुकूंदनगर आणि जामखेड शहर सील केले आहे. या ठिकाणी कोणालाही घराबाहेर सोडा या परिसरातून बाहेर पडून दिले जात नाही. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास परदेशी बाधीत पाहुण्याच्या संपर्कात आलेल्या जामखेडच्या तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामुळे एकच खळबळ उडाली.

तत्पूर्वी सोमवारी आलेल्या अहवालात त्या परदेशी पाहुण्याच्या शिष्टमंडळातील अन्य 9 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेचे सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, अवघ्या 24 तासात जामखेडमधील स्थानिक तिघांचे अहवाल बाधीत आल्याने आरोग्य विभागाची पुन्हा झोप उडाली आहे.

आरोग्य विभागाच्या सुत्रानूसार जामखेडच्या बाधीत त्या व्यक्तींच्या कुटूंबासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे नमुने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत घेण्यात येत होते. या सर्वांचे नमुने पुण्याच्या विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासह जामखेड शहर परिसारातील तीन किलो मीटरचा परिसारचा आरोग्य विभाग सर्वेक्षण करून ताप, खोखला आणि श्वासनाच्या विकार असणार्‍यांना वेगळे करून त्यांच्यावर गरजेनूसार उपचार करणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाने सोमवारी मुकूंदनगर भागातील परदेशी बाधीतांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीेंचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील स्थिती स्पष्ट होणार आहे. नगरच्या मुकूंदनगरचा अहवाल येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. यासह जिल्ह्याच्या विविध भागातील व्यक्ती बाधीत त्या परदेशी पाहूण्यांच्या संपर्कात आले होते, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

470 व्यक्तींना प्रशासनाचा आसरा
मजूरी बंद झाल्याने आपला कामाचा जिल्हा सोडून गावी निघालेल्या 470 व्यक्तींना जिल्ह्यातील विविध भागात तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांची त्याच ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे. सध्या जिल्ह्यात असे 470 व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या आसर्‍याला असल्याचे सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com