…म्हणून संजय राऊतच घेणार शरद पवारांची मुलाखत
स्थानिक बातम्या

…म्हणून संजय राऊतच घेणार शरद पवारांची मुलाखत

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीनंतर आता पुन्हा खासदार संजय राऊत शरद पवार यांची मुलाखत घेणार आहे. २९ डिसेंबरला पुण्यात प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. शरद पवारांची ही ‘राज’कीय मुलाखत प्रचंड गाजली होती. राष्ट्रीय पातळीवर या मुलाखतीची चर्चाही झाली. त्यानंतर, पुन्हा एकदा तशीच लोकप्रिय मुलाखत पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यात ज्या दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे, तेच एकमेकांचा सामना करताना पाहायला मिळणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com