सामान्य माणसाला समर्पित असा अर्थसंकल्प- आ. विखे
स्थानिक बातम्या

सामान्य माणसाला समर्पित असा अर्थसंकल्प- आ. विखे

Sarvmat Digital

लोणी (प्रतिनिधी)- सबका साथ सबका विकास या घोषणेला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला समर्पित झालेला असून, शेती, शिक्षण तसेच आरोग्य यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या भरीव आर्थिक तरतूदीतून सामाजिक सुरक्षा देण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे स्वागतच करायला हवे अशी प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी 16 सुत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. ही बाब अर्थसंकल्पात वेगळेपण दर्शविणारी आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना शेतकर्‍यांसाठी झिरो बजेट शेतीची मांडलेली संकल्पना शेतकर्‍यांना दिलासा देणारी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com