नगर : माळीवाडा परिसारात लटूमारी करणारा एकजण पकडला
स्थानिक बातम्या

नगर : माळीवाडा परिसारात लटूमारी करणारा एकजण पकडला

Sarvmat Digital

कोतवाली पोलीसांची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- माळीवाडा परिसारात परिस्थितीचा फायदा घेवून लुटमारी करणार्‍या एकाला कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे. गौतम रामदास कसबे (वय.32) केडगाव पाच गोडावून असे आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक भारत इंगळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी माळीवाडा परिसारात रस्त्याच्या कडेला दारूच्या नशेत तूर्त होवून पडलेल्या दारूड्याला दोघांनी लुटले होते. असे या परिसारात वारंवार होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यामुळे कोतवाली पोलीसांनी या भागावर लक्ष केंंद्रीत केलेले आणि या भागात गस्त घालत असतांना या परिसारातील एका हॉटेलच्या आडोशाला आरोपी कसबे उभा होता. पोलीसांना पाहून तो पळून जात असतांना पोलीसांनी त्याला पकडले.त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने उडावा-उडवीचे उत्तरे दिली.

चोरीच्या उद्देशाने आरोपी त्या ठिकाणी उभा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीसांनी आरोपी विरोधात कारवाई करत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com