Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा : माळीचिंचोरा शिवारातील कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

नेवासा : माळीचिंचोरा शिवारातील कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

नेवासा (तालुका प्रतिनिधी) — तालुक्यातील माळीचिंचोरा  येथील मुळा कालव्यामध्ये मायनर नंबर एक मध्ये वांढेकर वस्तीजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर इसम हा 55 वर्षे वयाचा असल्याचे समजते. अंगात पांढरा शर्ट, तोंडाला फडके बाधलेले आहे. याबाबत कालवा निरीक्षक यांनी दिलेल्या खबरी वरून नेवासा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोढवे हे करीत आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या