मुंबई : कोरोनाचा धारावीमधील चौथा बळी; कस्तुरबा रुग्णालयात वृद्धाचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा धारावीमधील चौथा बळी; कस्तुरबा रुग्णालयात वृद्धाचा मृत्यू

मुंबई : धारावी परिसरात कोरोना व्हायरसमुळे चौथा बळी गेल्याचे समजत आहे. ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण धारावीत आढळून आला होता. त्यानंतर तपासणीची सुरुवात करताच सद्य घडीला धारावीत कोरोनाचे २२ रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, महाराष्टर मागील १२ तासात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळुन येत असुन कोरोनच्या चाचणीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. यानुसार धारावी भागात लोकांचे स्क्रिनिंग करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल १५० डॉक्टरांची एक टीम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत धारावी भागात तपासणीसाठी रुजू झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com