कोरोना व्हायरस संकटाचा सामना धीराने करणे आवश्यक : शरद पवार

कोरोना व्हायरस संकटाचा सामना धीराने करणे आवश्यक : शरद पवार

मुंबई : कोरोना व्हायरस संकटाचा सामना धिराने करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे’ असे आवाहन राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशातील नागरिकांनी पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असून संकटात शासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

सध्या राज्यातील कामगार वर्गा वर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी उद्योग जगतातील वरिष्ठांनी याबाबत ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे.

कोरोना संकटाच्या काळात कोणताही पक्ष राजकारण आणत नाही ही जमेची बाब आहे. सर्वच पक्षांतील घटक यावर काम करत आहेत. त्यामुळे कुणीही राजकारण करत नाही हे महत्त्वाचे. अन्नधान्य पुरवठा आणि वैद्यकीय सेवा आदिची काळजी घेतली जात आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही पवार या वेळी म्हणाले.

या संकट काळात शेतकऱ्याला आपला शेतकमाल टाकून देण्याची वेळ आली आहे. त्याबाबतही सरकारने विचार करायला हवे. तसेच आरोग्य, उद्योग, व्यवसाय, शेती, सुरक्षा आणि यासोबतच इतरही विविध विषयांवर शरद पवार यांनी भाष्य केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com